प्रति एकर पाणी + औषध हे सर्वसाधारणपणे ४० लिटर असावे.(गल्लीच्या अंतरानुसार यात थोडा फरक पडतो*)
कुबोटा कंपनीचे २४२०, २४४१ व २७४१ या मोडेलसाठी, ट्रॅक्टरच्या किती RPM ला,कोणत्या गियरमध्ये, प्रतितास वेग किती असतो व त्यानुसार गल्लीच्या अंतराप्रमाणे प्रेशर किती ठेवायचे याबाबत तक्ते प्रत्येक ESS मशीन ग्राहकाला दिलेले आहेत. या तक्त्यांचा वापर करून अतिशयअचूकपणेफवारणीकरता येते. त्यासाठी बागेचे क्षेत्रफळ अचूक काढले पाहिजे व मोजून मापून पाणी (औषध) तयार करणे आवश्यक आहे.क्षेत्रफळकाढण्याचीपद्धत :
- एकएकर = ४३,५६०चौरसफूट
- समजाबागेमध्ये९x ५फूटयाअंतराचीलागवडआहे.
- म्हणजेच९X ५ = ४५चौरसफूट.
- म्हणजेच४३,५६०भागिले४५ = ९६८वेलीएकएकर मध्येबसतात.
- ज्याबागेचेक्षेत्रफळकाढायचेआहे,त्याबागेतिलओळीवएकाओळीतीलवेलींचीसंख्यामोजूनघ्यावी. अचूकपणेफवारणीकरण्यासाठीहेआवश्यकआहे.
- समजाफवारणीकरण्याच्याबागेमध्ये१६७०वेलीया९X ५फूटअंतरावरलागवडकेलेल्याआहेत. तरत्याबागेचेक्षेत्रफळकिती? तर१६७०/९६८ =१.७२५एकर
- म्हणजेच, एकरी ४० लिटर पाणी या प्रमाणे १.७२५ एकर साठी (१.७२५ x ४० = ६९) लिटर पाणी उडवावे लागेल.
- क्षेत्रफळनिश्चितझाल्यावरआपल्यालायोग्यप्रमाणातपाणीवऔषधघेतायेते.
पाण्याचा पंप कोरडा फिरु नये, यासाठी ESS मधील टाकीमध्ये २ लिटर पाणी शिल्लक राहीले पाहिजे. म्हणजेच वरील १.७२५ एकरच्या प्लॉट साठी ६९ + २ = ७१ लिटर पाणी घ्यावे लागेल.
अचूकपणासाठी, या जास्तीच्या पाण्यासाठी वापरायचे औषधाचे प्रमाण काढणे सुद्धा आवश्यक आहे. उदा: प्रति एकर ६ ग्रॅम GA / वापरायचा असेल तर असे त्रैराषिक मांडावे :
- ४० लिटर पाणी = ६ ग्रॅम GA
- ४२ लिटर पाणी = ६.३ ग्रॅम GA घ्यावा
क्षेत्रफळ अचूक मोजणे व त्या क्षेत्राफळासाठी किती पाणी लागेल हे अचूकपणे काढणे अत्यंत गरजेचे आहे.
ESS ने उत्तम फवारणी साधण्यासाठी खालील महत्वाच्या बाबीं लक्षात घ्याव्यात.
ESS नेफवारणीकरतानानोझलपासूनसगळ्यातजवळचेपान/ घडयातीलअंतरकिमानदोनफूटअसावेलागते. फवारानीटपसरण्यासाठी इतके किमान अंतर आवश्यक आहे.कमालअंतर५, ६ किंवा ७ फुट असले तरी चालू शकते. हे दोन पद्धतीने साध्य करता येते.
- फवारणीयंत्रहायड्रोलिकपट्ट्याद्वारेवरखालीकरतायेते. हायड्रोलिकपट्ट्या वर / खालीकरून नोझल ते घड / पान हे अंतर हे किमान २ फुट ठेवता येते. असे करतानाटॉपलिंकअॅडजस्टकरूनमशीनजमिनीलासमांतरठेवणेगरजेचेआहे.
- दोन्हीबूमज्याप्लेटवरबसवलेआहेतत्याबॅकप्लेटचे४नटकाढूनआख्खीप्लेटखालीकरतायेते. यापद्धतीनेसुद्धानोझल ते घड / पान हे अंतर किमान २ फुट ठेवतायेते.
ESSयंत्रावरील दोन नोझलमधील अंतर सेट करणे.
अमेरीकनESS 80SR मधूननिघणाराफवाराहाफक्त१५0ते१८0इतकाचपसरतो.म्हणजेचकॅनोपीच्यामर्यादितभागासाठी 1 नोझलवापरलेजाते. म्हणूनच ESS स्प्रेयरला१४नोझलवापरलेजातात. कॅनोपीमधील सर्वभागालायाप्रत्येकनोझलचाफवारासमप्रमाणातदिलापाहिजे. प्रत्येक नोझलमधून उडालेला फवारा कॅनोपिमध्ये दुसऱ्या नोझालच्या समीप यावा परंतू एकमेकांमध्ये मिसळू नये अशा पद्धतीने नोझल अॅडजस्ट करावे.
गल्लीचेअंतरवकॅनोपीचाविस्तारयानुसारनोझलव्यवस्थितअॅडजस्टकरण्यासाठी,प्रत्येकनोझलज्यास्टीलएल्बोवरबसवलेआहेत्याचेदोन नटथोडासैलकरूननोझलअॅडजस्टकरतायेते.उत्तमरिझल्टसाठीहेप्रत्येकबागेनुसारकरणेगरजेचेआहे.
बागेमध्येफवारणीची तयारी:
अ.अनेक औषधे एकत्र करण्याचा मोह निश्चित टाळावा. (विशेषकरून GA सोबत बुरशी नाशके व सूक्ष्म अन्नद्रव्ये)
अ.प्रथम आर्धी टाकी पाणी भरून, मग औषधे टाकावीत. पावडर स्वरुपाची औषधे प्रथम बादली मध्ये थोड्या प्रमाणात विरघळून घेऊन, गाळून मगच टाकीत भरावीत. Mixer ने ढवळण्याची क्रिया, म्हणजेच PTO चालू करून उरलेले पाणी भरावे. हे नेहमीच मोजून मापून अचूक करावे.
बागेमध्येफवारणी करताना:
- ट्रॅक्टर व यंत्र बागेच्या १० फुट बाहेरून सुरु करावे. यामुळे सुरवातीच्या वेलीपासून पूर्ण प्रेशर ने उत्तम फवारा बसतो.
- शक्यतो एक आड एक ओळ या पद्धतीने फवारणी करावी.
- ट्रॅक्टर वळवण्यास पुरेशी जागा असल्यास, ट्रॅक्टरचा वेग कमी न करता, बूमचा फवारा बंद न करता, क्लच / ब्रेक न वापरता पहिल्या गल्लीमधून तिसऱ्या गल्लीमध्ये वळावे.
- जागा अपुरी असल्यास, बूमचा फवारा बंद करून, ट्रॅक्टर मागे / पुढे करून वळवून घ्यावा. ट्रॅक्टर व यंत्र शक्य तितके मागे नेऊन फवारणी चालू करावी.
- एकाच वेगाने ट्रॅक्टर चालवत, संपूर्ण बागेची फवारणी करावी. काही अपरिहार्य कारणामुळे बागेमध्ये फवारणी बंद करायची झाल्यास, प्रथम बूमचे नळ बंद करून फवारा बंद करावा. परत फवारणी चालू करताना, ज्या ठिकाणी फवारणी बंद केली तेथून १० ते १२ फुट मागे जाऊन फवारणी चालू करावी.
- अर्धी ओळ फवारायची गरज असेल तेथे, यंत्राचा एक बाजूचा बूम बंद करून फवारणी करावी.
- मुद्दामून बागेच्या कडा मारणे आवश्यक नाही.
- प्रत्येक बुमवरील नोझलचा फवारा कॅनोपी मधील क्षेत्रापुरताच जाईल याची खात्री करावी. (कॅनोपीच्या बाहेर, खाली / वर अथवा पलीकडील ओळीवर फवारा जाऊ नये)
- GA हे स्पर्श्यजन्य क्रिया असलेले रसायन आहे. जास्त आद्रता असताना याची उपलब्धता चांगली होते, म्हणूनच जास्तीत जास्त आद्रता मिळण्यासाठी, GA चा फवारा संध्याकाळ ते पहाट या कालावधीमध्ये करण्याची आम्ही शिफारस करतो. डेल्टा मीटरचा वापर करून "डेल्टा T" म्हणजेच फवारणीची सुयोग्य वेळ कळते. "डेल्टा T" म्हणजे तापमान व आर्द्रतेच गुणोत्तर आहे, ते अंदाजाने काढता येत नाही. म्हणून डेल्टा मीटर चा वापर अवश्य करावा. जास्त व दीर्घकाळ आर्द्रतेसाठी GA ची फवारणी रात्री केली जाते. याचा अर्थ GA अंधारात फवारावे असा नाही. काही ठिकाणी / काही वेळा दुपारी सुद्धा "डेल्टा T" उत्तम असतो (२ ते ८). अशा वेळेस फवारणी करायला हरकत नाही. डेल्टा T हा १० च्या वर असल्यास फवारणी करू नये.
- दव पडण्याच्या तीन तास आधी फवारणी घेण्यास हरकत नाही.
डेल्टा मीटर:
- "डेल्टा T” चे मोजमाप २ पासून चालू होते.
- फवारणीची उत्तम वेळ (“डेल्टा T”) खालील प्रमाणे आहे.
- २ ते ६ : “डेल्टा T” सर्वोत्कृष्ट.
- ६ ते ८ : “डेल्टा T” उत्तम.
- ८ ते १० : शक्य असल्यास फवारणी टाळावी.
- १० च्या वरती : फवारणी मुळीच करू नये.
- टीप: डेल्टा T”, हवेचा वेग यांच्या नोंदी प्रत्यक्ष शेतामध्येच फवारणी पूर्वी घ्यायच्या असतात.
नोझलचार्जमोजणे (हेप्रत्येकफवारणीपूर्वीकरायचेआहे )
ॲल्युमीनियमपट्टीजोडलेलीलालवायर, मीटरच्या RED लिहलेल्यापोर्टमध्येघालावी, काळी वायर Black लिहलेल्यापोर्टमध्ये. मध्यभागातीलखटकाआकृतीमध्येदाखवल्याप्रमाणे२००लिहिलेल्याआकड्यासमोरठेवावा.
मल्टीमीटरनेचार्जकसामोजावा:
फवाराचालूअसतानालालरंगाच्यावायरलाजोडलेलीपट्टीहिनोझलच्या१इंचवरतीपकडूनकाळीवायरहिनोझलच्याखालच्याबाजूसअर्थिंगसाठीएखाद्यानटावरअथवास्वच्छलोखंडीभागावरठेवावी.त्यानंतरमीटरवरचार्जमोजावा.(वरदाखवल्याप्रमाणेमीटरचालूकरणे).
नोझल चार्ज हा ९ mA च्या पुढे असेल तर उत्तम चार्ज आहे.याचा अर्थ १५, २० अथवा २५ असा चार्ज दिसत असेल तर सदर नोझल अधिक कार्यक्षम आहे असे मात्र नाही.
जर नोझल चार्ज ९ पेक्षा कमी दाखवत असेल तर, नोझल साफ नाही
/ त्यामध्ये कचरा आहे. अशा वेळेला नोझल साफ
करणे गरजेचे आहे.
टीप: अमेरिकन ESS 80 SR 14 GB ने द्राक्षांसाठी PGR फवारणी वेळापत्रक. (लेख क्रमांक ८) पाहावा.
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात
या चौकटीवर क्लिक आहे, त्यावर क्लिक करा. नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल. लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.





